April 20, 2026

वेश्या व्यवसाय करणाऱ्या ईसमावर एम एच बी कॉलनी पोलीसांची पिटा कायद्यान्वये कारवाई – विजय परमार

Spread the love

वेश्या व्यवसाय करणाऱ्या ईसमावर एम एच बी कॉलनी पोलीसांची *पिटा कायद्यान्वये कारवाई* — विजय परमार

 

 

*स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या एकाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे*.

 

एम एच बी कॉलनी पोलीस ठानेचे *पो ऊ नि डॉ दिपक हिंडे* यांना गोपनीय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की, एक इसम काही महिलांना बोलावुन घेवुन गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेवुन त्यांना पैशाचे आमीष व आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवुन अनैतिक व्यापार करणेसाठी महिलांना बोलावुन घेवुन गि-हाईकांना महिला पुरवत असलेबाबत माहीती मिळालेने सदरची माहिती *वपोनि सुधीर कुडाळकर* यांना दिली असता त्यांनी तात्काळ मा सहाय्यक पोलीस आयुक्त , बोरीवली विभाग यांचेकडून परवानगी घेऊन *पो नी मते, पो ऊ नी हिंडे, पो ऊ नि साळवे, पो ऊ नि जिरोनेकर, पो ह भारती, म पो शी पुजारी , म पो शी इलग* यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करुन कलम ४,५ पिटा कायदा १९५६ अन्वये १ पिडीत महिले ची सुटका केली. तसेच १ आरोपीना अटक केली. पिडीत महिलेस सुधारगृहात पाठवले आहे.

 

अटक करण्या आलेल्या आरोपीची नावे पुढील प्रमाणे,

 

१) अजय अमृतलाल ठक्कर, वय – ५८ वर्ष, व्यवसाय – नाही, रा. ठी. रूम नं ए/ १७, कैलास नगर, शंकर लेन, कांदिवली पश्चिम , मुंबई .

 

तपास चालू…..

 

 

आदरपूर्वक,

 

 

सुधीर कुडाळकर,

वरीष्ठ पोलीस निरीक्षक,

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई