July 12, 2026

दहिसर पश्चिम मुंबई येथील *सोन्याच्या कंपनीतून 95 ग्रॅम सोने घेऊन फरार झालेला सोनार काम करणाऱ्या 2 कारागीरास* , हावडा, पश्चिम बंगाल येथुन अटक – विजय परमार

Spread the love

दहिसर पश्चिम मुंबई येथील *सोन्याच्या कंपनीतून 95 ग्रॅम सोने घेऊन फरार झालेला सोनार काम करणाऱ्या 2 कारागीरास* , हावडा, पश्चिम बंगाल येथुन अटक – विजय परमार

 

➡️ एमएचबी कॉलनी पो ठाणे मुंबई गु.र. क्र. 99/23 कलम 381 भा द वि

 

➡️ *गुन्हा दाखल दिनांक व वेळ* *01/03/2023*

 

➡️ *फिर्यादी*

श्री. सोमनाथ जालंदर मल्लीक, वय-42 वर्षे, धंदा-सोने व्यवसाय

 

➡️ *थोडक्यात हकीकत*

फिर्यादी यांचा सोन्याचा कारखाना 139/बी वैशाली इंडस्ट्रीज,म्हात्रेवाडी रोड,बडोदा बँकेजवळ,दहीसर प.मुंबई या ठिकाणी आहे. सोन्याच्या कारखाण्यात फिर्यादी यांचे नोकर आरीफ सलीम शेख व इतर 17 नोकर हे कामास आहे ते सर्वजन दुकानातच झोपतात. शुक्रवारी दी. 28/02/2023 रोजी आरीफ शेख वय 26 वर्षे,रा.ठी.- कमलनगर कालना, ब्लॉक न.1,जीला वर्धमान,राज्य-पश्चिम बंगाल हा सकाळी 08.30 वाजता ते 08.50 वाजताचे दरम्यान कोणासही सशंय न येऊ देता अंगात निळा टी शर्ट व हाफ पँट घालुन पँटमध्ये सोन्याचे मणी घालुन कारखाण्याच्या बाहेर निघुन गेला.

 

➡️ *तपास*

वर नमूद फिर्यादी कडून फरार आरोपीचा मोबाईल नंबर हस्तगत झाला. सदर मोबाईल नंबर बाबत तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. दिनांक 01/03/2023 रोजी दुपारी तीन वाजता आरोपीताचे मोबाईल लोकेशन अहमदाबाद येथील मिळाले. तात्काळ एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे ,पोलीस हवालदार प्रवीण जोपले व पोलीस शिपाई अर्जुन आहेर यांची टीम अहमदाबाद या ठिकाणी रवाना केली. सदर प्राप्त लोकेशन ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वत्र आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही. या दरम्यान आरोपीने त्याचा फोन स्विच ऑफ केला होता. परंतु अरोपिताच्या जुन्या मोबाईल नंबर चे तांत्रिक विश्लेषण करून स.पो.नि. सूर्यकांत पवार यांनी आरोपीच्या मित्राचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला, त्याचे मित्राकडून आरोपीचा नवीन मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे पुन्हा आरोपीचे लोकेशन घेतले असता तो अहमदाबाद ते हावडा च्यादिशेने मिळू लागले. सदर लोकेशन व वेळेचा अभ्यास केल्यानंतर आरोपी हे अहमदाबाद टू हावडा जाणाऱ्या ट्रेनमध्ये असल्याची दाट शक्यता मिळाली. त्यानंतर वेळ न घालवता पोलीस पथक बाय रोड मुंबई येथे येऊन 03/02/2023 रोजी विमानाने हावडा येथे 6.25 वाजता एअरपोर्ट कोलकत्ता येथे उतरून टॅक्सी द्वारे बाय रोड खडकापूर जंक्शन या ठिकाणी पोहोचले. अहमदाबाद येथून सुटलेली ट्रेन ही या खडकापूर जंक्शन येथे आल्यानंतर सदर ट्रेनमध्ये पोलीस पथकाने प्रवेश मिळवला. या ट्रेनचे 12 स्लीपर कोच व 3 जनरल डबे तपासले केले त्यामध्ये आरोपी मिळून आले नाहीत. त्यानंतर एसी 3 टायर डब्यामध्ये आरोपीचा शोध घेतला असता नमूद फरार आरोपी मिळून आला. त्यांचेकडे तपास केला असता त्याचा अजून एक साथीदार सलमान शेख असल्याचे त्याने सांगितले. आरोपीचा फोनवरून सलमान शेख यास हावडा, प बंगाल येथे चतुराईने बोलावून घेतले व त्यास ताब्यात घेवुन पोलीस पथक पोलीस ठाणे येथे आले. तांत्रिक तपास आणि चपळाईचा वापर करून सदर आरोपीतांस ताब्यात घेण्यात एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यास यश प्राप्त झाले.

यातील सुमारे 40 ग्रॅम मालमत्ता ही दोन्ही आरोपींनी शिवडी, मुंबई व अहमदाबाद, गुजरात येथे विक्री केल्याचे समजले आहे. व बाकी मुद्देमाल आरोपी आरिफ शेख यांचेकडून हस्तगत झाला आहे.

 

 

➡️ *अटक आरोपी*

 

*1.आरिफ सलीम शेख, वय-29 वर्ष, धंदा- सोनार कलाकाम कारागीर, राहणार – वर्धमान, प. बंगाल*

 

*2. सलमान सूकुर शेख, वय 29 वर्ष, राहणार – वडाळा, मुंबई, मुळ गाव – वर्धमान, प. बंगाल येथून अटक

 

 

*(सुधीर कुडाळकर)*

*वरिष्ठ पोलीस निरीक्षक,*

*एमएचबी कॉ. पो. ठाणे*