एम एच बी पोलीस ठाणे येथे *बळजबरीने गाडी अडवून मारहाण करणाऱ्या ३ आरोपीस चार तासांमध्ये* अटक केले बाबत- विजय परमार
दिनांक 01/4/2023 रोजी मुलगा नामे आमिर रेहान हॅरिस वय 19 वर्ष, राठी – A/1203, अक्वेरिया ग्रँड,देविदास लेन,बोरिवली पश्चीम मुंबई,ह्यांनी समक्ष पोलिस ठाणे कळविले की, दिनांक 31/03/2023 रोजी रात्री 12.30 ते 12.45 वां च्या दरम्यान मंडपेश्वर मेट्रो स्टेशनच्या खाली गणपत पाटील नगर न्यू लिंक रोड बोरीवली पश्चिम मुंबई या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वॅगनार गाडी क्रमांक MH 03, BE 7508 मधील 3 अनोळखी इसम ह्यांनी संगनमत करून फिर्यादी ह्यांच्या ताब्यातील गाडी क्र.MH 47,BF 4395 हीस त्यांच्या ताब्यातील वाहनाने ओव्हरटेक करून , निष्काळजीपणाने ,भरधाव वेगाने व बेदारकरपणे वाहन चालून फिर्यादी ह्यांच्या गाडीसमोर आडवी उभी करून अटकाव केला तसेच त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून वर नमूद 3 अनोळखी इसमविरोधत एम एच बी पोलीस ठाणे *गु.र क्रमांक 149/2023कलम 341, 323, 504, 506 (2) , 34 भादविसह कलम 177 मोटर वाहन कायदा* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता .
*तपास* – नमुद गुन्ह्यातील घटनास्थळी जावून सदर ठिकाणी असलेलं cctv फुटेज च्या सहय्याने 3 ही अनोळखी इसमाने वापरलेले वॅग्नोर गाडी क्रमंक मिळवून सदर गाडी क्रमांकाचा संपूर्ण माहिती RTO मार्फत मिळवून गुंडा पथक व गुन्हेप्रकटीकरण ह्यांच्या मदतीने शोध घेण्यात आला.सदर आरोपित्त ह्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने विचरपुस केली असता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्याच्या तपसकमी हजर राहण्यासाठी CRPC 41(1)(अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली.
*नमूद आरोपित पुढीलप्रमाणे -*
1)श्री.सूरज बाप्पा नाड, वय -27 वर्ष,राठी – E/03, लिंक व्ह्यू ,I.C कॉलनी,न्यू लिंक रोड,बोरिवली पश्चीम मुंबई
2)श्री. शेल्टीन अँथनी डायस , वय -29 वर्ष, राठी – दिपदर्शन,B विंग,404,IDFC बँक समोर,I.C. कॉलनी, बोरिवली पश्चीम मुंबई
3)श्री. पुरुषोत्तम चंदन बडलानी वय -43 वर्ष, राठी – 704, वाल्मिकी अपार्टमेंट, कांदरपाडा,बोरिवली पश्चीम मुबई
( *सुधीर कुडाळकर* )
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
MHB कॉलनी पोलीस ठाणे

More Stories
महाराष्ट्र पंढरपुर अखिल भारतीय श्री नामदेव छीपा समाज महासभा समिति कोटा (पंजीकृत)एवम समस्त शिम्पी समाज बहुउदेशिय समाजोन्नती संस्था द्वारा पंढरपुर अधिवेशन के पोस्टर का किया विमोचन – विजय परमार
श्री नामदेव युवा मंडल सहयोगी विट्ठल महिला मंडल पालघर जिला की द्वितीय बैठक संम्पन्न – विजय परमार
मुम्बई जूना पुणे मुम्बई हाइवे पर बस गिरी खाई में हुआ बड़ा हादसा – विजय परमार