December 3, 2024

बांग्लादेशी घुसखोर नागरिकास अटक केलेबाबत- विजय परमार

Spread the love

*बांग्लादेशी घुसखोर नागरिकास अटक केलेबाबत* – विजय परमार

 

*विशेष शाखा- २ व विशेष शाखा- १, गु.अ.वि., मुंबई मार्फतीने मुंबई शहरात अनधिकृतपणे राहणान्या घुसखोर बांग्लादेशी नागरिक यांना शोधून काढून, त्यांचेवर केंद्र सरकारने निर्देशित केल्यानुसार कारवाई करून, खटले दाखल करून, त्यांना हद्दपार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते.*

 

 

 

त्यानुसार दिनांक 01/02/2023 रोजी एम एच बी कॉलनी पोलीस ठाणेचे *पो.उ.नि. डॉ. दिपक हिंडे* यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे हद्दीत काही घुसखोर बांग्लादेशी नागरीक नेहमी ये-जा करीत असतात अशी गोपनिय माहिती मिळाली.

 

सदर गोपनिय माहिती बावत *श्री. सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक,* यांनी गोपनिय बातमीची खात्री करुन, कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश देवून स.पो.नी. सिद्धे, पो.उ.नि. डॉ. दिपक हिंडे, पो ना भारती / ०५०३३९ पोलीस शिपाई क्र. ०९०९०५/ घुगे पोलीस शिपाई क्र. ११३१९४ / अहिरे, पो.शी. घोडके/ १९०६२९ यांना छाप्यासंदर्भात सुचना दिल्या.

 

सदर गोपनिय माहिती प्रमाणे नमुद बांगलादेशी घुसखोर इसम हा गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, बोरीवली पश्चिम मुंबई या ठिकाणी एका संशयीत इसमास सापळा रचुन त्यास अटकाव केला. त्यास त्याचे नाव व मुळ गाव व भारतीय नागरिकत्वाबाबतचे पुरावे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या एकंदर बोली भाषेवरुन तो परदेशी नागरीक असल्याची खात्री झाल्याने दोन पंचांना पाचारण करून त्यांच्या समक्ष त्याला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली असता त्याचे नाव *जकारिया जहांगीर मुल्ला, वय 35 वर्ष, व्यवसाय- कडिया, रा. ठी, शिवार गार्डन, सुपर मार्केट जवळ, मिरा रोड, पूर्व, जी. ठाणे, मुळगाव- व्होबाद, थाना- कालिया, जिल्हा नदियाल, राज्य-खुलना, देश- बांगलादेश* असे सांगितले. तसेच तो मुळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.

 

तसेच तो बांग्लादेश मार्गे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून य मुलखी अधिकान्याच्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश करुन कलकत्ता मार्गे मुंबईत प्रवेश केल्याचे सांगितले.

 

त्याचे विरुद्ध एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे विस्था. *वी.स्था. गु.र.क्र. ५३/२०२२, कलम- नियम ३ सह ६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० परिच्छेद ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकिय नागरिक कायदा १९४६* अन्वये नोंद करुन नमुद गुन्हयात त्यास दिनांक ०१/०२/२०२३ रोजी अटक करण्यात आली.

 

सदर गुन्हयातील अटक आरोपीतास दि. ०१/०२/२०२३ रोजी मा. महानगर दंडाधिकारी, ६७ वे न्यायालय, बोरिवली, मुंबई यांचे न्यायालयात रिमांडकामी हजर करत आहोत.

 

 

 

आदरपूर्वक….

 

सुधीर कुडाळकर,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे,

मुंबई.