June 8, 2024

खंडेश्वर पुलिस स्टेशन, नई मुम्बई के प्रयत्न से मर्डर कर्ता गिरफ्तार-विजय परमार

Spread the love

*खंडेश्वर पुलिस स्टेशन*, नई मुम्बई के प्रयत्न से मर्डर कर्ता गिरफ्तार *CR NO 175/22 U/S 307, 504 IPC* – विजय परमार

 

दिनांक 26 जून 2022 रोजी कोम्बिंग ऑपरेशन करिता रवाना झाले पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना रात्रपाळी पर्यवेक्षक अधिकारी पोलिस निरीक्षक मते यांनी दूरध्वनीद्वारे कळवले कि, त्यांना मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी कळविले आहे की, खांदेश्वर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथून एक आरोपी नामे शिवरामकृष्ण रविकुमार राव, वय 30 वर्ष, हा इंदिरानगर, जयवंत सावंत मार्ग, दहिसर पश्चिम मुंबई येथे आलेला आहे. नमूद आरोपीताने एका इसमावर खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला आहे व तो त्यांचे राहते घर परिसरात लपून बसला आहे. सदर बाबत खांडेश्वर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा क्र. 175/2022 कलम 307, 504 IPC अन्वये गुन्हा दाखल आहे. सदरची माहिती प्राप्त होताच खांदेश्वर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बरकडे यांना पोउनि बोंबे यांनी दूरध्वनीवर संपर्क करून आरोपीताचे वर्णन व माहिती घेतली, त्यानुसार आरोपीचा त्याचा राहते घर परिसरात जाऊन पोह तावडे, पोना परीट, यांचेसह शोध घेतला असता आरोपी हा मराठा स्नॅक सेंटर, इंदिरानगर, दहिसर पश्चिम मुंबई येथे मिळून आला व तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलीस पथकाने शिताफीने पकडुन ताब्यात घेतले व मुख्य नियंत्रण कक्षास व पोनी मते यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली, मुख्य नियंत्रण कक्षाचे पोउनि नाईक यांनी माहिती दिली की सविस्तर स्टेशन डायरीला नोंद घेऊन आरोपी इसम नामे शिवरामकृष्णन रवी कुमार राव यास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरकडे यांच्या ताब्यात द्यावे त्यानुसार नमूद आरोपीतास खांडेश्वर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बरकडे व पोलीस नाईक बाचकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई व.पो.नि. कुडाळकर सो. व पो. नि. शिंदे (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

 

सुधीर कुडाळकर,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

एम एच बी कॉलनी पो. स्टेशन मुंबई