July 18, 2024

पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 , मुंबई मधील गुन्हा प्रकटीकरण अधिकारी व पथक यांची थरारक, रोमांचक यशस्वी कामगिरी – विजय परमार

Spread the love

*पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 , मुंबई मधील गुन्हा प्रकटीकरण अधिकारी व पथक यांची थरारक , रोमांचक यशस्वी कामगिरी* – विजय परमार

*Special 26 अंबिवली*

दिनांक 04/02/2023 *माननीय पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 11,श्री अजय कुमार बन्सल* सरांनी एम एच बी कॉलनी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार व पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे पथक यांना गुन्हा रजिस्टर क्रमांक
1 ) 1003/22 कलम 392, 34 भादवी
2) गु.र.क्र 52/22, कलम 392,34 भा.थ.वि
मधील पाहिजे आरोपी यास आंबिवली, इराणी वस्ती, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे इथून अटक करण्याची एक मोठी व अवघड अशी जबाबदारी सोपवली….

*सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार* यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त केली की, नमुद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी दिनांक 04/02/2022 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी इराणी मजदीच्या बाजूला चहाच्या टपरीवर येणार आहे .

आंबिवली मधील इराणी वस्ती ही फार पूर्वीपासून चोरांची वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोठमोठे इराणी आरोपी वास्तव्यास आहेत हे ईराणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यांमध्ये जाऊन चेन स्नॅचिंग, बतावणी, फसवणूक, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे करून मिळणाऱ्या चोरीच्या पैशावर स्वतःचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रकारच्या चोऱ्या करून पैसे कमावणे हे यांचे मुख्य काम आहे. इतकेच नाहीतर यांना अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यासाठी घरातील महिला फार मोठा बॅकअप देतात या इराणी वस्तीमध्ये आत्तापर्यंत कोणतेही पोलिसांनी येऊन येथील आरोपीस अटक करण्याचा प्रयत्न केल्यास वस्तीवरील सर्व महिला एकत्र येऊन पोलिसांना घोळका घालून त्यांना दगडफेक करून पोलिसांना प्रतिकार करून आरोपीतास घेऊन जाण्यास विरोध करतात कोणत्याही आरोपीताला इराणी वस्तू मधून कोणतेही पोलीस घेऊन जाऊ शकत नाहीत. इथून मागे अशा प्रकारच्या जितक्या कारवाया झाल्या त्या कारवायांमध्ये पोलिसांना अपयश आलेले आहे व पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत अशा या इराणी आरोपींना अटक करायचे असेल तर गावाच्या बाहेर कट करून आरोपीला घेरुन अटक केली जाते. या आंबिवली गावामध्ये कोणताही नवीन व्यक्ती आल्यास त्याची खबर तात्काळ या इराणी लोकांना मिळते तसेच या गावांमध्ये कोणतीही नवीन गाडी, कोणतीही पोलिसांची गाडी आली तर त्याची माहिती गावापर्यंत पोहोचवण्यासाठी या इराणी लोकांनी तशा प्रकारचे खबरी गावाच्या सुरुवातीला बसवलेले आहेत. गावामध्ये प्रवेश करण्यासाठी एक नदी आहे त्या नदीवरून जाणारा ब्रिज आहे गावामध्ये येण्यासाठी हा एकच ब्रिज असल्यामुळे या इराणी लोकांना पोलिसांची खबर लगेचच गावामध्ये मिळते व हे इराणी आरोपी सतर्क होतात. अशा या इराणी आरोपीला त्यांच्या वस्तीतून उचलणे हे खूप मोठे,अवघड व खूप रिस्की असे टास्क होते. हे टास्क एकाच पोलीस ठाणेची टीम पूर्ण करेल हे शक्य नाही म्हणून हा टास्क पूर्ण करण्यासाठी आम्हाला अजून पोलीस स्टेशनची मदत हवी आहे अशी विनंती सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 यांना केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 सरांनी तुम्हाला हवी ती मदत मिळेल व तुम्ही तुम्हाला हवे असलेले लोक बोलून घ्या अशी परवानगी दिली. हा टास्क पूर्ण करण्यासाठी तात्काळ परिमंडळ-11 अंतर्गत चारकोप पोलीस ठाणे, बोरवली पोलीस ठाणे व मालाड पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथक यांची मदत मागितली. वरील मदतीनुसार *बोरिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के व पथक, चारकोप पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण ठोके व पथक, मालाड पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे व पथक आणि एम एच बी कॉलनी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवे, पोलीस हवालदार नंदकिशोर तावडे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, पोलीस हवालदार संदीप परीट, पोलीस नाईक सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर,पोलीस शिपाई महेंतश सवळी, पोलीस शिपाई योगेश मोरे, महिला पोलीस शिपाई पुजारी* तसेच 2 अॅम्बुलंस चालक, 3 कांदिवली पोलीस मित्र असे एकूण 26 जणांची टीम बनवण्यात आली.

*प्लान-* आंबिवली गावात जाण्यासाठी दोन ॲम्बुलन्स वाहनाचा वापर करायचा व दोन प्रायव्हेट गाड्यांचा वापर करायचा, सोबत पिस्टल, लाठ्या, हातकडी कॅरी करायचे. गावाच्या बाहेर पोहोचल्यावर 26 लोक चार वाहने, 3 टीम मध्ये विभाजन करायचे. नंबर 1 टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व पथक, नंबर 2 टीम पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे व पथक ,नंबर 3 टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक टोके व पथक. नंबर 1 टीम इराणी वस्ती बाजारपेठ मधील मच्छी मार्केट जवळ एक अंबुलन्स व रिक्षा सोबत थांबेल, नंबर 2 टीम अटली कोळीवाडा येथे ॲम्बुलन्स व एक प्रायव्हेट गाडी असे थांबेल, नंबर 3 टीम गुप्त बातमीदाराच्या माहिती द्वारे चालेल. गुप्त बातमीदाराच्या कॉलवर तिन्ही टीम इराणी वस्तीच्या मज्जित जवळील चहाच्या टपरीवर येतील व सदर आरोपीस ताब्यात घेतील सदर आरोपीतास ताब्यात घेतेवेळी जर इराणी वस्तीवरील लोकांनी व महिलांनी टीमवर अटॅक केल्यास नंबर 3 टीम ही लाट्या घेऊन त्यांना प्रतिकार करेल नंबर 2 टीम ही सदर आरोपीतास उचलून ॲम्बुलन्स मध्ये टाकेल व नंबर 3 टीम ही बाहेर पडण्यासाठी रोड मोकळा करेल. जाताना तिन्ही बाजूंनी 3 टीम येतील व एक्झिट होताना रेल्वेफाटक च्या रोडने सर्व टीम एक्झिट होतील, जर रेल्वे फाटक बंद असेल तर यु टर्न मारून आलेल्या रोडने सर्व टीम एक्झिट होतील. एक्झिट झाल्यानंतर प्रत्येक टीम मधील आपले सर्व लोक आल्याची खात्री पवार साहेबांना देतील व तिथून तिन्ही टीम हायवेच्या दिशेला जलद गतीने निघून येतील. संपूर्ण कार्यवाईदरम्यान कम्युनिकेशन प्रॉपर होईल याची काळजी टीम कमांडर घेतील, ठरलेल्या प्लान नुसार व ठरलेल्या रूट नुसार सर्व गोष्टी प्रॉपर झाल्या गुप्त बातमीदाराचा कॉल आला की सदर आरोपी हा पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून चहाच्या टपरीवर बसलेला आहे पवार साहेबांच्या कॉलवर तिन्ही टीम रवाना झाल्या, जसे नंबर 2 टीम ॲम्बुलन्स इराणी वस्तीमध्ये एन्ट्री केली त्या क्षणी तेथील आरोपी त्यांना पोलीस आल्याची कुणकुण भासली जशी त्यांना आमची ॲम्बुलन्स येताना दिसली तसा त्या आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला व पूर्ण गल्लीमध्ये पोलीस आल्याची आरडाओरडा सुरू झाला इराणी वस्तीवरील सर्व लोक व महिला यांनी दंगा सुरू केला नंबर 2 टीम मधील लोकांनी आरोपीला पळताना पाहिला व प्रायव्हेट गाडी त्याच्या विरुद्ध दिशेला लावून आरोपीला ब्लॉक केला व गाडीतून उतरून आरोपीवर झडप टाकली जशी आरोपीवर झडप टाकून आरोपीला पकडले तसे सर्व लोकांनी दंगा आरडाओरडा करून पूर्ण टीमला घेरले आणि दगड फेकण्यास सुरुवात केली आरोपीला पळवून लावण्यासाठी सर्व पर्याय वापरू लागले. तितक्यात आमच्या तिन्ही टीम एकत्र आल्या व लाठ्या काढून पटापटा जमलेल्या लोकांना व महिलांना बाजूला करू लागले खूप मोठ्या प्रमाणात टीमवर दगडफेक झाली. टीम वर जीवघेणा हल्ला झाला तरी सुद्धा टीमने आरोपीला सोडले नाही आरोपीला 800 मीटर उचलून ॲम्बुलन्स कडे खेचून आणले. येताना दगड सर्वांना लागत होते कोणाच्या डोक्यावर कोणाच्या पायावर कोणाच्या पाठीवर दगडे बसत होती पण कोणतीही टीम मागे हटली नाही इराणी लोकांनी मोठ्या ॲम्बुलन्समधील चालकाला बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठी ॲम्बुलन्स तिथून पुढच्या स्पॉटला घेऊन गेले ऐनवेळी आरोपी ताब्यात आहे पण गाडी नसल्यामुळे पुन्हा मोठा मॉप जमा झाला व आरोपीला बाहेर काढणे अवघड झाले इतक्यात छोटी ॲम्बुलन्सला बोलवले गेले आणि छोट्या ॲम्बुलन्स मध्ये चपळाईने त्या आरोपीला ॲम्बुलन्स मध्ये टाकण्यात आले व एकाच प्रायव्हेट गाडीमध्ये जितके लोक बसतील तितके लोक बसून दोन्ही बाजूला लटकून आरोपीचे अंबुलन्स सह इतक्या मोठ्या गर्दीतून बाहेर पडले, बाहेर पडताना दोन्ही बाजूने दगडांचा पाऊस टीमवर होत होता अशा अवघड रस्त्यामधून इतक्या अडथळ्यामधून आरोपीला घेऊन तिन्ही टीम रेल्वे फाटक चा रोड मधून बाहेर आले. बाहेर आल्यावर आपले सर्व लोक सुखरूप आल्याची खात्री झाल्यावर जलद गतीने तिन्ही टीम हवेच्या दिशेने बाहेर पडून नाक्यावर थांबले. इतक्या मोठ्या अवघड परिस्थितीतून इराणी वस्तीतून आरोपीला उचलून आणण्यात टीमला यश आले….. ऑपरेशन आंबिवली टीम मधील सर्वांनी टीमवर्क व कॉर्डिनेशन सांभाळून कष्टाने आणि चातुर्याने काम करून इतक्या मोठ्या आरोपीला त्याच्या वस्तीतून उचलून बाहेर आले व एक खूप मोठे यश संपादन केले…. आजची ही संयुक्त कार्यवाही खूपच धाडसी अशी पार पाडून आरोपीला अटक केले खरोखर एक अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आज या 26 लोकांनी केलेली आहे. स्वतःच्या जीवाची काळजी न करता दिलेले ध्येय पूर्ण केले व मुंबई पोलिसांचे नाव उज्वल केले आहे अशा प्रकारच्या कार्यवाह्या करून आरोपींच्या वर्तणुकीला आळा घालण्याचे काम सतत पोलीस करत असते त्याचेही एक ज्वलंत उदाहरण बनले आहे. अशी ही कार्यवाही सतत स्मरणात राहील अशी झालेली आहे……

*अटक आरोपी*:-
मोहम्मद@ संगा S/O जाकिर फर्जद सय्यद रा.ठि :- अंबिवली कल्याण

*गुन्हे अभिलेख* :-
गुजरात,महाराष्ट्र तसेच युपी येथे मिळून 27 जबरी चोरी व बतावणी चे गुन्हे
*सदर आरोपी सन 2021 मध्ये गुजरात पोलीसांनी केलेल्या मकोका मधील जामिनावर सुटलेला आहे.*

उघडकीस आलेले गुन्हे :-
MHB PS
1)Cr 52/2022, Us 392,34 IPC
2)Cr 1003/2022, Us 392,34 IPC
3)Cr 843/2022,Us 420,170,34 IPC

नमुद आरोपित इसमास उदईक रोजी मा.महानगर दंडाधिकारी,68 वे न्यायालय,मुंबई यांचे समक्ष हजर करण्यात येत असून मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.

आदरपूर्वक,

*सुधीर कुडाळकर*,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी पोलीस ठाणे,मुंबई