एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, परिमंडळ 11
प्रेस नोट
दि 24/04/2022
*अंमलीपदार्थ विक्री करणारे इसमांस एम एच बी कॉलनी पोलीसांकडून अटक*
मा.पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी मुंबई शहरात वाढत असलेल्या अंमलीपदार्थ विक्री करणारे व सेवनार्थी यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करून अंमलीपदार्थ विक्री करणारे आरोपीत इसम यांचा शोध घेवुन अशा प्रकारचे गुन्हयांना आळा घालण्यासाठी व समुळ नष्ट करणेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेशित केले. त्याप्रमाणे मा.अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, कांदिवली (पु), मुबई तसेच मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ११, मुंबई व मा. सहायक पोलीस आयुक्त, बोरिवली विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व व. पो. नि. सुधीर कुडाळकर, एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई यांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक व एटीसी पथक यांची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना याबाबत कारवाई करण्यास आदेशित केले आहे.
त्याप्रमाणे दिनांक २३/०४/२२ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्ती दरम्यान गस्त करत असताना पोनि किरण सुरसे,सपोनि घोडके ,गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि संदिप साळवे तसेच मपोह क्र 00395/ मौळे, पो.शि111518/ सवळी, पोना 980725/खोत व पो.शि. 140340/मोरे यांना ” सेंट फ्रांसिस शाळेजवळ, दहिसर नदिकिनारा, बोरिवली(प), मुंबई येथे उभ्या असण-या एका महिलेच्या हालचाली संशयीत वाटल्या तसेच तिच्या हातातील छोटया पारदर्शक पिशवीत कोणतीतरी वस्तुंची असल्याचे सदर ठिकाणी दिसले. नमुद महिलेने आम्हा पोलीस पथकास पाहिले व ती तेथुन निघुन जाण्याचे तयारीत असताना पोलीस निरीक्षक किरण सुरसे, सपोनि घोडके, पोउपनि. साळवे व पोलीस पथकाने मपोह मौळे यांचे मार्फतीने तीला शिताफीने ताब्यात घेतले. सदर महिलेस पो. नि. सुरसे यांनी पंचासमक्ष हिंदी भाषेत संभाषण करून यह बॅग किसका है और उसमे क्या है ? याबाबत विचारणा केली असता, तीने तीच्या जवळील पिशवी ही स्वतःची असल्याचे सांगून त्यामध्ये हिरॉईन हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले व अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता सदर ठिकाणी आले असल्याचे तीने सांगितले.
नमुद महिलेजवळ मिळुन आलेल्या जप्त मुद्देमालाचे वजन 345 ग्रॅम “ हेरॉईन ” (किं.अं. 51,75,000/-रु.) नमुद महिलेस तीचे पुर्ण नाव विचारले असता तीने तीचे नाव १) श्रीमती मुस्कान दिपक कनोजीया, वय-23 वर्षे, असल्याचे सांगितले. अशा प्रकारे अंमलीपदार्थ विक्री करण्यास परवानगी नसताना देखिल अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी स्वत: जवळ बाळगले म्हणून नमुद महीलेविरूध्द एम एच बी कॉ पोलीस ठाणेस गु.नोंद क्र.360/2022 कलम-8 (क) सह 21 (क) एन. डी. पी. एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करून नमूद महिलेस गुन्हयात अटक करण्यात आली.
नमूद आरोपीत महीलेचा अधिक कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का तसेच नमूद महीलेचे इतर सहकारी मुंबई मध्ये आणखी कोणत्या ठिकाणी अंमलीपदार्थ विक्री करीत आहेत किंवा कसे याबाबत अधिक तपास करून इतर आरोपीत इसमांना अटक करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण सुरसे करत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. विरेंद्र मिश्रा अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. विशाल ठाकुर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ११, मुंबई, मा. रेखा भवरे, सहा. पोलीस आयुक्त, बोरिवली विभाग, मुंबई व मा. सुधीर कूडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम एच बी कॉ पोलीस ठाणे, किरण सुरसे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बपु घोडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारि संदीप साळवे व पथकातील अंमलदार व पो.ह.क्र.00395 / मौळे, पोना 980725/ खोत , पो.शि 111518/ सवळी व पो.शि. 140340/मोरे यांनी पार पाडली.
More Stories
श्री नामदेव युवा मंडल सहयोगी विट्ठल महिला मंडल पालघर जिला की द्वितीय बैठक संम्पन्न – विजय परमार
मुम्बई जूना पुणे मुम्बई हाइवे पर बस गिरी खाई में हुआ बड़ा हादसा – विजय परमार
CIB क्राइम इन्वेस्टिगेशन ब्यूरो कार्यलय में मनाई गयी अंबेडकर जयंती – विजय परमार